ब्लिन्कीट रायडर्सना पार्किंग नाकारल्याने वर्ध्यात संताप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न
ब्लिन्कीट रायडर्सना पार्किंग नाकारल्याने वर्ध्यात संताप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न
वर्धा |शहर प्रतिनिधी अमन नारायणे
वर्धा वर्धा शहरात कार्यरत असलेल्या ब्लिन्कीट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळे सुमारे २०० युवकांना रोजगार मिळत आहे. मात्र पार्किंगच्या प्रश्नावरून ब्लिन्कीट रायडर्सना जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात रायडर्सनी वर्ध्यातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
ब्लिन्कीट स्टोअरसमोरील जागा ‘नो पार्किंग’ म्हणून घोषित असली तरी कामाच्या स्वरूपामुळे रायडर्सच्या दुचाकी वाहनांसाठी कोणताही पर्यायी उपाय न देता सरसकट चलान कारवाई केली जात असल्याचे रायडर्सचे म्हणणे आहे.
ही कारवाई एका स्थानिक व्यक्तीच्या दबावामुळे होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
एका व्यक्तीच्या सोयीसाठी २०० युवकांच्या रोजगारावर गदा येत असल्याची भावना रायडर्सनी व्यक्त केली. रोजंदारीवर काम करणारे युवक दररोज चलान, दंड आणि मानसिक त्रासाला सामोरे जात असून, अनेक रायडर्स नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणी ब्लिन्कीट रायडर्सनी जिल्हाधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांकडे पुढील मागण्या केल्या आहेत —
स्टोअरसमोरील जागेत ब्लिन्कीट रायडर्सच्या दुचाकींसाठी नियंत्रित व विशेष पार्किंगची व्यवस्था करावीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील चलान कारवाई तात्काळ थांबवावीए का व्यक्तीच्या दबावाखाली होत असलेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी
रोजगार देणाऱ्या कंपनीवर अप्रत्यक्ष दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
“वर्धा हा गांधींचा जिल्हा आहे. येथे मेहनत करून रोजगार मिळवणाऱ्या युवकांना न्याय मिळाला नाही तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतील,” असा इशारा रायडर्सनी दिला आहे.
प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ब्लिन्कीट रायडर्सकडून देण्यात आला आहे.